Nitin Raut on Ladki Bahin Yojana: निधी नसेल, तर योजना बंद करा, नितीन राऊतांचा सल्ला

Nitin Raut: लाडकी बहीण योजना बंद करण्याचा विचार करा, निधीची कमतरता
Published by :
Riddhi Vanne

विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान राज्य सरकारने "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" सुरु करण्यात आली होती. या योजनेमध्ये महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. पण आता ही योजने राज्य सरकारला डोकेदुखी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या योजनेसाठी उर्वरित विभागांसाचा निधी वळवल्यामुळे मंत्र्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान कॉंग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले आहे, की त्यापेक्षा ही योजना बंद करा, असे नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले नितीन राऊत?

राज्यसरकारकडे लाडकी बहीण योजना चालवयाला पैसे नसतील तर, योजना बंद करा. तुम्हाला कोणी अडवलं आहे. सामाजिक न्याय या बजेट मधला निधी लाडक्या बहीणीसाठी का वापरता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com