Nitish Kumar : तब्बल 20 वर्षानंतर नितीश यांच्या मंत्रिमंडळात मोठा बदल

Nitish Kumar : तब्बल 20 वर्षानंतर नितीश यांच्या मंत्रिमंडळात मोठा बदल

बिहारमध्ये पुन्हा नितीश राज सुरू झालं आहे. दहावी वेळा (Bihar) काल नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळात परंतु यावेळी मोठा बदल झाल्याचं समोर आलं आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

बिहारमध्ये पुन्हा नितीश राज सुरू झालं आहे. दहावी वेळा (Bihar) काल नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळात परंतु यावेळी मोठा बदल झाल्याचं समोर आलं आहे. नव्या मंत्रिमंडळामध्ये सर्वात महत्त्वाचा असलेला गृह विभाग भाजपकडून असलेले उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. भाजपचे नेते असलेल्या सम्राट चौधरी नितीश सरकारमध्ये कायदा-सुव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत.

नितीश कुमार गेल्या २० वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. नितीश कुमार २००५ पासून राज्याचं नेतृत्व करत आहेत. त्यांचे मित्रपक्ष वेळोवेळी बदलले. पण मुख्यमंत्रि‍पदी नितीश कुमार कायम राहिले. सोबतच त्यांनी गृह मंत्रालय कायम स्वत:कडं ठेवलं. २०२० मध्ये त्यांच्या पक्षाला केवळ ४३ जागा मिळाल्या. तर भाजपनं ७४ जागा जिंकल्या होत्या. मात्र, त्या परिस्थितीतही नितीश यांनी मुख्यमंत्रि‍पदासह गृह विभाग स्वत:कडं ठेवला. पण यंदा त्यांनी गृह मंत्रालय सोडलं आहे. यावर आता नितीश कुमार हे फक्त चेहरा आहेत. खरी सत्ता आता भाजपच्या हातात गेली आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.

नितीश कुमार यांनी गृह मंत्रालय कायम स्वत:कडं राखलं. त्या माध्यमातून स्वत:ची सुशासन बाबू अशी प्रतिमा जाणीवपूर्वक निर्माण केली. याचा फायदा त्यांना झाला. महिला मतदार जेडीयूशी जोडल्या गेल्या. कायदा, सुव्यवस्थेची स्थिती सुधारल्याचा सर्वात मोठा महिला वर्गाला झाला. त्याशिवाय नितीश कुमार यांनी वेळोवेळी महिलांसाठी, मुलींसाठी योजना आणल्या. शाळकरी मुलींना सायकल, महिलांना नोकरी, निवडणुकीत आरक्षण महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. दारुबंदीचा कायदा केला. याचा फायदा नितीश कुमारांना झाला. जेडीयूला मतदान करणाऱ्या महिलांचं प्रमाण वाढलं.

गेल्या वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात खाते वाटपावरुन जोरदार चुरस पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते. पण भाजपनं मुख्यमंत्रिपद स्वत:कडे घेतलं. त्यानंतर शिंदेसेनेनं गृह मंत्रि‍पदाचा आग्रह धरला. पण भाजपनं ती मागणीदेखील फेटाळली. भाजपनं बिहारमध्ये मात्र जेडीयूकडे गृहमंत्रिपदाचा विषय लावून धरला आणि २० वर्षांनंतर जेडीयूला गृहमंत्रिपद सोडावं लागलं. भाजपनं गृहमंत्रिदासाठी सम्राट चौधरी यांची वर्णी लावली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com