Nitish Kumar : नितीश कुमारांनी भाजपा सरकारचा पाठिंबा काढला

Nitish Kumar : नितीश कुमारांनी भाजपा सरकारचा पाठिंबा काढला

नितीश कुमार यांनी मणिपूरमध्ये भाजप सरकारचा पाठिंबा काढल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जेडीयूने भाजपपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by :
shweta walge
Published on

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षांचा पाठिंबा घेऊन भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेत आले. आता, बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जनता दल (युनाइटेड) (जेडीयू) ने बुधवारी मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. २०२२ पासून जेडीयू आणि भाजपाची युती होती, परंतु आता जेडीयूने सत्ताधारी भाजपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जनता दल यूनायटेडने मणिपूरमध्ये बिरेन सिंह यांच्या नेतृत्वातील भाजपच्या सरकारला दिलेला पाठिंबा वापस घेतला आहे. यामुळे भाजपला मणिपूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. मणिपूरमध्ये जेडीयूचे एकूण सहा आमदार होते. यातील पाच आमदारांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जेडीयूकडे फक्त एकच आमदार होता. आता त्यांनी पण आपला पाठिंबा वापस घेतला आहे. आता हा एकमेव आमदार विरोधी पक्षाच्या बाकावर बसणार आहे. जेडीयूचे आमदार यापूर्वीच भाजपमध्ये आल्यानं सरकारवर कोणताही परिणाम होणार नसून, सरकार स्थित आहे. मात्र यातून नितीश कुमार यांनी केंद्र सरकारला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. कारण सध्या नितीश कुमार यांचा पक्ष केंद्रात एनडीए सरकारसोबत आहे.

60 जागांच्या मणिपूर विधानसभेत भाजपकडे 32 जागा मिळवून बहुमतासह सत्तेत आहे. त्याचसोबत नितीश कुमारांचा जेडीयू पक्षाच्या 6 जागा निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांचे 5 आमदार भाजपने गळाला लावले. आता मणिपूरमध्ये जेडीयूकडे अवघा एकच आमदार शिल्लक आहे. तरीही मणिपूरमध्ये नितीश कुमार हे भाजपसोबत सरकारमध्ये सामील होते. पण आता त्यांच्या पक्षाने भाजप सरकारमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com