T20 World Cup
T20 World Cup

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

आयपीएल २०२३ मध्ये इम्पॅक्ट प्लेयरचा नवा नियम लागू करण्यात आला. या नियमानुसार संघ प्लेईंग ११ शिवाय आणखी एका खेळाडूचा संघात समावेश करु शकते.

Mitchell Starc On Impact Player Rule : कोलकाता नाईट रायडर्सचा दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने इम्पॅक्ट प्लेयर नियमाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमामुळे फलंदाजांना मोठी सूट मिळत आहे. परंतु, टी-२० वर्ल्डकपमध्ये इॅम्पॅक्ट प्लेयरचा नियम नाही. त्यामुळे या विश्वचषकात इतके हाय स्कोअरिंग सामने होतात की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं मिचेल स्टार्क म्हणाला.

मिचेल स्टार्क पत्रकार परिषदेत म्हणाला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इम्पॅक्ट प्लेयरचा नियम नाही. यामुळे धावांवर काय फरक पडणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यामुळे खूप काही फरक पडेल, असं मला वाटतं. जेव्हा इम्पॅक्ट प्लेयर नसतो, तेव्हा संघातील समतोल पाहिला जातो. त्यावेळी अष्टपैलू खेळाडूंचं महत्त्व अधोरेखीत होतं. तुमच्याकडे जेव्हा ११ खेळाडू असतात, तेव्हा कर्णधारालाही एक वेगळी रणनीती आखावी लागते.

आयपीएलमध्ये सुरु करण्यात आलेल्या या नियमामुळं फलंदाजी खूप वेळ सुरु राहते आणि पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना आक्रमकपणे खेळण्याची भीती वाटत नाही. या नियमामुळेच आयपीएलमध्ये इतक्या धावा कुटल्या आहेत, असं नाही. तर काही जबरदस्त इनिंगही आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत.

आयपीएल २०२३ मध्ये इम्पॅक्ट प्लेयरचा नवा नियम लागू करण्यात आला. या नियमानुसार संघ प्लेईंग ११ शिवाय आणखी एका खेळाडूचा संघात समावेश करु शकते. आयपीएल २०२४ दरम्यान इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमाची खूप चर्चा झाली. रोहित शर्मा, रिषभ पंत, मुकेश कुमार, अक्षर पटेल आमि मोहम्मद सिराजसह अनेक खेळाडू या नियमामुळे खूश नाहीत. या खेळाडूंनी या नियमाबद्दल नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com