Radhakrishna Vikhe : मदतीपासून कोणीही वंचित राहाणार नाही; मंत्री विखेंची ग्वाही

Radhakrishna Vikhe : मदतीपासून कोणीही वंचित राहाणार नाही; मंत्री विखेंची ग्वाही

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शंभुराजे देसाई यांनी कर्जत तालुक्यातील होलेवाडी, चिलवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची पाहणी केली.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • अतिवृष्टीने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल

  • अभियंताना सर्व्हेक्षण करण्याचे आदेश

  • सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शंभुराजे देसाई यांनी कर्जत तालुक्यातील होलेवाडी, चिलवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची पाहणी केली. जलसंपदा मंत्र्यांनी या भागातून जाणाऱ्या कुकडी कालव्याच्या रूंदीकरणाचे आणि मजबुती करणाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश कुकडी प्रकल्पाच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले.

अतिवृष्टीने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी कर्जत तालुक्यात होलेवाडी चिलवडी आणि नवलेवाडी येथे अतिवृष्टीने (Heavy Rain) निर्माण झालेल्या परीस्थितीची पाहणी करून ग्रामस्थांच्या भेटी घेवून संवाद (Flood) साधला. प्रामुख्याने कुकडी कालव्याच्या अवतीभोवती झालेले अतिक्रमण आणि भराव खचल्याने कालव्यातून मोठ्या प्रमाणात आलेले पाणी शेजारच्या वाड्या वस्त्यांपर्यत आले. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल (Radhakrishna Vikhe) होतात. ही बाब ग्रामस्थांनी मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिली.

सर्व्हेक्षण करण्याचे आदेश

मंत्री विखे पाटील यांनी कुकडी कालव्याच्या अधिक्षक अभियंता श्रीमती अहीरराव यांना तातडीने या कामाचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले. यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासित केले. त्यांनी सांगितले की, अन्य काही काम ही जलसंधारण विभागाशी संबंधित असल्याने यासंदर्भात विभागाचे अभियंता गायमुखे यांनी गांभीर्याने निर्धारीत वेळेत याबाबत प्रस्ताव तयार करावेत. त्यालाही मान्यता लगेच देत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

नुकसानीचे पंचनामे सुरू

कमी लोकसंख्येची वस्ती असली, तरी अनेक वर्ष पुलाची मागणी पूर्ण झाली नाही. या तक्रारीचे गांभीर्य घेवून पुलाच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि कार्यकारी अभियंता यांनी समन्वयाने काम सुरू करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून हे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. राज्यासह जिल्ह्यात निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाचे गांभीर्य राज्य सरकारने घेतले. सर्व मंत्री जनतेत जावून परिस्थिती जाणून घेत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

आम्हाला देवी प्रसन्न होते…

संजय राऊत रोज बोलले नाही तर, संपादक म्हणून त्यांची ओळख राहणार नाही. त्यांच्या बोलण्याला आम्ही महत्व देत नाही, असे सांगून मंत्री विखे पाटील यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना माहूरची देवी आमची कुलदेवता आहे. अनेक वर्ष पहिल्या माळेला मी तिथे जातो. आम्हाला देवी प्रसन्न होते. सदावर्तेंना होत नसेल तर त्यात माझा काय दोष ॽ

सर्व मंत्री वेगवेगळ्या भागात

मंत्री शंभूराज देसाई यांनी शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेण्यासाठी सर्व मंत्री वेगवेगळ्या भागात गेले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कोण काय टिका करतो, याला आम्ही महत्व देत नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना रेडकार्पेट पाहणी, दौरे कोणी केले, त्याचे पुढे काय झाले? त्या सरकारच्या काळात काय घडले? यावर आम्हाला बोलता येईल. मात्र, आजच्या परिस्थितीत राजकारण आम्हाला करायचे नाही, अशा शब्दात मंत्री देसाई यांनी आमदार रोहीत पवार यांच्या समाज माध्यमावरील टिकेला उतर दिले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com