ताज्या बातम्या
Mahakumbh Mela : प्रयागराजमध्ये 'नो व्हेईकल झोन' घोषित
उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात भाविक मोठ्या संख्येने येत आहेत.
उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. यातच शनिवार व रविवार मोठ्या प्रमाणात गर्दी प्रयागराजमध्ये होण्याची शक्यता लक्षात घेऊन याच पार्श्वभूमीवर महाकुंभ पुन्हा एकदा 'नो व्हेईकल झोन' घोषित करण्यात आला.
महाकुंभमेळ्यात आतापर्यंत 50 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. यातच शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने गर्दी लक्षात घेता, महाकुंभ पुन्हा एकदा दोन दिवसांसाठी 'नो व्हेईकल झोन' घोषित करण्यात आला आहे.
महाकुंभात स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळत असून महाकुंभात वाहनांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी घालण्यात आली असून फक्त आपत्कालीन वाहनांना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.