ताज्या बातम्या
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना उच्च न्यायालयाकडून नोटीस
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना उच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना उच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. नितीन गडकरींनी लोकसभा निवडणुकीत नियमभंग केल्याची याचिका बहुजन स्वराज पक्षाचे उमेदवार अँड सुरज मिश्रा यांनी दाखल केली आहे.
लोकसभा निवडणुकीत नियमभंग केल्याचा दावा करत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका ऑक्टोबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती.
मतदानाच्या दिवशी गडकरी यांच्या कार्यकर्त्यांनी एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदान केंद्राची माहिती आणि चिट्ठीवर गडकरी यांची छायाचित्रे होते. अशी तक्रार राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती.
याच पार्श्वभूमीवर न्या. उर्मिला जोशी -फाळके यांच्या खंडपीठाने गडकरींना नोटीस बजावत तीन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.