Stamp Paper : आता अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्पवर होणार वडिलोपार्जित जमीनीची वाटणी, जाणून घ्या…

Stamp Paper : आता अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्पवर होणार वडिलोपार्जित जमीनीची वाटणी, जाणून घ्या…

स्टॅप पेपर अनेक महत्त्वाच्या कामात होतो. यामध्ये आर्थिक व्यवहार असो, जमिनीचे व्यवहार किंवा कायदेशीर प्रतिज्ञापत्र असो, अशा प्रत्येक ठिकाणी स्टँम्प पेपरची भूमिका मोठी असते.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

स्टॅप पेपर अनेक महत्त्वाच्या कामात होतो. यामध्ये आर्थिक व्यवहार असो, जमिनीचे व्यवहार किंवा कायदेशीर प्रतिज्ञापत्र असो, अशा प्रत्येक ठिकाणी स्टँम्प पेपरची भूमिका मोठी असते. कायदेशीर व्यवहारात त्याला अनन्यसाधारण महत्त्व असते. सरकारला संपत्तीची खरेदी-विक्री करताना काही शुल्क द्यावा लागतो. तो स्टॅम्प ड्यूटीच्या रुपात देतात. याच स्टॅम्प पेपर संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे.वडिलोपार्जित जमीन, जागांची मुला-मुलींच्या नावे वाटणी आता अवघ्या ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर होणार आहे. यासंदर्भातील सरकारी निर्णय अद्याप झालेला नाही, परंतु महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तशी घोषणा केली आहे. ५ ते ३० हजार रुपयांपर्यंत यामुळे बचत होणार आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ८५ नुसार संयुक्त धारण केलेल्या जमिनीत एकापेक्षा जास्त सह-धारक असतील तर त्यांना जमिनीतील त्यांच्या वाटणीच्या हिश्श्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येते. मालकी हक्काबाबत वाद असेल तर दिवाणी न्यायालयीन खटला दाखल होईपर्यंत वाटणी थांबते. आदेशानंतर वाटणीची कार्यवाही फक्त तहसीलदारांमार्फत केली जाते आणि यासाठी एक रुपयाही खर्च होत नाही .

तसेच संमती देणारे वडील त्यांच्या मुलांना जमीन आणि मालमत्ता देत असतील त्यासाठी एक किंवा दोन टक्के सेंट स्टॅम्प ड्युटी, नोंदणी शुल्क आणि २०० ते ५०० रुपये स्टॅम्प पेपर लागतो. परंतु, महसूल विभागाच्या प्रस्तावित निर्णयानंतर, कोणतेही शुल्क न भरता वडिलोपार्जित जमिनीचे हिस्से अवघ्या ५०० रुपयांत मुलांच्या नावे करता येणार आहेत. त्याठिकाणी सर्वांची संमती आणि वाटप होणारे क्षेत्र निश्चित केलेला स्टॅम्प दुय्यम निबंधक कार्यालयात दिल्यावर संबंधित मुलांच्या नावे तेवढे क्षेत्र होईल, असं सांगण्यात आलं.

शासनाचा निर्णय अद्याप झालेला नाही

सध्या वडिलोपार्जित किंवा वडिलांच्या नावावरील जमीन मुलांच्या नावे करण्यासाठी वाटणीपत्र केले जाते. यासाठी, ५०० रुपये स्टॅम्प खर्च आणि एक टक्के नोंदणी शुल्कआवश्यक आहे. मालमत्तेसाठी फक्त दोन टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्का नोंदणी शुल्क भरावे लागेल. यामध्ये आता बदल होणार आहे,परंतु सरकारने त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरकारी निर्णयानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल, अशी माहिती विभागाकडून मिळत आहे.

आताच वाटणीपत्र

वडिलांची मालमत्ता मुलांना हस्तांतरित करण्यासाठी वाटणीपत्र, बक्षीसपत्र जारी केले जाते. या अंतर्गत, मुद्रांक शुल्क दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन इतरांप्रमाणे नियमित भरण्याचा कोणताही खर्च नाही. वडिलांच्या जमिनीची नोंदणी करण्यासाठी, नोंदणी शुल्क 1,000 ते 3,000 रुपये (जमिनीच्या बाजारभावानुसार) आणि मुद्रांक शुल्क 500 रुपये आहे.त्यावर प्रॉपर्टीचा हिस्सा मुलांच्या नावे करता येतो. जमिनीचा काही हिस्सा मुलीच्या किंवा बहिणीच्या नावे करताना बक्षीसपत्र करावे लागते. त्यासाठी एक टक्का स्टॅम्प ड्यूटी व २०० रुपयांचा स्टॅम्प द्यावा लागतो. वडिलांच्या नावावरील प्लॉटमधील हिस्सा मुला-मुलींच्या नावे करण्यासाठी दोन टक्के स्टॅम्प ड्यूटी द्यावी लागते. तसेच एक टक्का नोंदणी शुल्क देखील भरावे लागते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com