Raosaheb Danve
Raosaheb DanveTeam Lokshahi

आता महाराष्ट्राला 11 हजार कोटींचा निधी मिळतोय, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

अहमदनगर-न्यू आष्टी आणखी एक डेमू रेल्वे सेवा आजपासून सुरु झाली आहे.

अहमदनगर-न्यू आष्टी आणखी एक डेमू रेल्वे सेवा आजपासून सुरु झाली आहे. अहमदनगर स्थानकाहून आज दुपारच्या सुमारास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे सेवेचं उद्घाटन करण्यात आलं.

Raosaheb Danve
शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींनी प्लॅन सांगितला

अगोदर रेल्वे महामार्गासाठी महाराष्ट्राला 1100 कोटी रुपयांचा निधी मिळत होता, आता मोदी सरकार आल्यानंतर 11 हजार रुपये कोटींचा निधी मिळतोय, तरीही महाराष्ट्राला काही न मिळाल्याचा सूर विरोधकांकडून लावण्यात येत असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

ते बोलताना पुढे म्हणाले, मागील अनेक दिवसांपासूनची नगर-बीड रेल्वेची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचं काम पूर्ण करून घेण्याकडे लक्ष असल्याचंही ते म्हणाले आहेत. एवढंच नाही तर ही रेल्वे पुणे, मुंबईला जाईल या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com