देशात आता तांदूळ आणि डाळीचे भाव कडाडणार

देशात आता तांदूळ आणि डाळीचे भाव कडाडणार

देशात महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे.

देशात महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. इंधन, घरगुती आणि व्यावसायिक वापराचा सिलिंडर, खाद्यतेल आणि अन्नधान्याच्या किमती सर्वच महाग होत चालले आहे.

यातच आता तांदूळ आणि डाळींच्या किमतीत झपाट्याने वाढ होणार असल्याचे समजते. काही राज्यात तुफान पाऊस झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कडधान्यांच्या उत्पादनातही पाच टक्के घट झाली. पुढील वर्षी उन्हाळ्यादरम्यान डाळी आयात कराव्या लागण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. खरिपाचे उत्पादन घटले आहे. गेल्या वर्षीपेक्षाही उत्पादनाचा आकडा कमी होणार आहे. यामुळे तांदूळ, डाळींच्या किंमती कडाडण्याची शक्यता आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com