ताज्या बातम्या
बीडमध्ये ओबीसी समाज आक्रमक; परळीत ओबीसी समाजाकडून रास्तारोको
लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे.
लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके उपोषण करत आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत.
याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. परळीत ओबीसी समाजाकडून रास्तारोको करण्यात येत आहे. बीड, परभणी, सोनपेठकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
ओबीसी समाजाकडून रास्तारोको करत जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असून लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळताना दिसत आहे.