OBC Aarakshan:आरक्षण टिकवण्यासाठी ओबीसी नेत्यांना लक्ष्मण हाके यांचे 'हे' संदेश

ओबीसी आरक्षणावर सुरू असलेल्या चर्चेत हाके यांची ठाम भूमिका. पक्षभेद विसरण्याचे आवाहन करून नेत्यांचे लक्ष वेधले.
Published by :
Team Lokshahi

थोडक्यात

  • ओबीसींच्या लढ्यास नवा जोर

  • उद्विग्नतेतून पोस्ट लिहिल्याचे स्पष्टीकरण

  • आरक्षण टिकवणेच अंतिम ध्येय

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात पुन्हा चर्चेला उधाण आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजातील नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले असुन पक्षभेद विसरून समाजाच्या हितासाठी लढा देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हाके म्हणाले की, चळवळ थांबवण्याबाबतची त्यांची पोस्ट ही उद्विग्न भावनेतून लिहिलेली होती. समाजाच्या भावनांचा आदर राखूनच पुढील भूमिका ठरवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांचा भर ओबीसी समाजाच्या हक्क आणि अधिकारांवर होता.

"ओबीसी आरक्षण टिकवणे हेच आपले ध्येय आणि धोरण आहे," असे स्पष्ट शब्दांत सांगत लक्ष्मण हाके यांनी हा लढा शेवटपर्यंत नेण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजाने एकत्र येऊन आपले हक्क जपले तर कुणीही ते हिरावून घेऊ शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com