चंद्रपूरमध्ये 'या' दिवशी ओबीसी महाएल्गार मेळावा होणार

चंद्रपूरमध्ये 'या' दिवशी ओबीसी महाएल्गार मेळावा होणार

चंद्रपूरमध्ये 2 ऑक्टोबरला ओबीसी महाएल्गार मेळावा होणार आहे.
Published on

चंद्रपूरमध्ये 2 ऑक्टोबरला ओबीसी महाएल्गार मेळावा होणार आहे. चंद्रपूर येथे सायंकाळी 5.30 वाजता प्रा.लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचे जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

ओबीसी सेव संघ, चंद्रपूर तर्फे मराठ्यांचे ओबीसीकरण करु नये, ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, 72 ओबीसी वसतिगृह त्वरित सुरु करण्यात यावे या मागण्यासाठी व ओबीसी समाजात जनजागृती होण्याच्या दृष्टीने हा मेळावा आहे.

प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात हा मेळावा होणार असून लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे.

या मेळाव्याला उद्घाटक म्हणून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार असून ओबीसींच्या या महाएल्गार मेळाव्यातून काय घोषणा करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com