Office Look : ऑफिस पार्टीत फॉर्मल आणि फेस्टिव्ह लूकसाठी 'या' टिप्स

Office Party Look : ऑफिस पार्टीत फॉर्मल आणि फेस्टिव्ह लूकसाठी 'या' टिप्स

ड्रेसिंग टिप्स: फॉर्मल आणि फेस्टिव्ह पोशाखात समतोल राखण्यासाठी उपाय. ऑफिस पार्टीसाठी योग्य पोशाख निवडून आकर्षक दिसा.
Published by :
Riddhi Vanne
Published on

ऑफिसमध्ये काम करताना आपण प्रोफेशनल पोशाख परिधान करतो, पण जेव्हा ऑफिसमध्ये पार्टीचं आयोजन केलं जातं, तेव्हा आपण थोडं वेगळं आणि आकर्षक दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र हे करताना "जास्त फॅन्सी पण नको, आणि खूप साधंसुद्धा नको" असा विचार येतो. अशा वेळी पोशाख निवडताना फॉर्मल आणि फेस्टिव्ह यामधील योग्य समतोल राखणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. खाली विविध प्रकारच्या ऑफिस पार्टीसाठी ड्रेस आयडिया दिल्या आहेत, ज्या तुमचा लूक अपग्रेड करतीलच, पण ऑफिसच्या शिस्तीशी सुसंगतही असतील.

जर पार्टी रेस्टॉरंट, बँक्वेट हॉल किंवा हॉटेलमध्ये असेल, तर थोडं क्लासी दिसणं गरजेचं असतं महिलांसाठी मिडी ड्रेस, सॅटिन रॅप ड्रेस किंवा चांगल्या फॅब्रिकचा जम्पसूट हे उत्तम पर्याय ठरतात. यावर हलकी एम्बेलिशड क्लच आणि पंप हिल्स वापरल्यास लूक अधिक उठून दिसतो. पुरुषांसाठी नीट ब्लेझर, सॉलिड रंगाचा शर्ट आणि चिनो पँटसह क्लासिक लोफर्स हा लूक साधा पण प्रभावी ठरतो.

सणासुदीच्या काळात पार्टी असेल, तर थोडे चमकदार रंग, टेक्सचर किंवा प्रिंट वापरले तरी चालतात. महिलांसाठी सिक्विन स्कर्ट आणि सिंपल टर्टलनेक, किंवा मेटॅलिक ब्लाउज आणि स्ट्रेट कट पँट हे चांगले पर्याय आहेत. यावर अँकल बूट्स शोभून दिसतात. पुरुषांनी शर्टवर गडद रंगाचा स्वेटर आणि ट्राउझर्ससह एक छोटासा फेस्टिव्ह टाय लूक अधिक खुलवतो.

जर पार्टी ऑफिसमध्येच किंवा लंच गेट-टुगेदर स्वरूपाची असेल, तर आरामदायक पण नीट पोशाख निवडणं योग्य ठरेल. महिलांसाठी डार्क जीन्स आणि कॉर्प टॉप, किंवा बेल्टेड निट ड्रेस उत्तम पर्याय आहेत. पुरुषांसाठी स्मार्ट पोलो शर्ट आणि खाकी पँट, किंवा नीट ब्लेझर आणि डेनिम्स वापरले तर लूक अधिक प्रभावी होतो.

जर पार्टी थीमबेस्ड असेल, तर त्यानुसार थोडं हटके दिसायला हरकत नाही. पण ऑफिसमधील लोक असतील हे लक्षात घेऊन लिमिटमध्ये राहणं आवश्यक आहे. रंगीत स्कार्फ, जाकीट, किंवा वेगळी बॅग वापरून थीम व्यक्त करता येते.

>फारसा ओपन किंवा आकर्षक पोशाख टाळा

>आरामदायक शूज निवडा

>मिनिमल ऍक्सेसरीज वापरा

>तुमचं आत्मविश्वास व्यक्त करणारा पोशाख निवडा

ऑफिस पार्टीमध्ये ड्रेसिंग म्हणजे तुमचा प्रोफेशनल आणि पर्सनल स्टाइलचा समतोल दाखवण्याची संधी आहे. योग्य पोशाख तुमचं व्यक्तिमत्त्व उंचावतो, आणि तो योग्य निवडल्यास तुमचं इम्प्रेशन अधिक सकारात्मक होतं. त्यामुळे पार्टी कोणतीही असो स्टायलिश आणि सुसंगत दिसणं नेहमीच फायदेशीर ठरतं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com