मुंबई-गोवा हायवे संबधीत अधिकाऱ्यांना आ. भास्कर जाधव यांच्या कडक भाषेत सुचना
निसार शेख, रत्नागिरी
खासदार सुनिलजी तटकरे रत्नागिरी संसदीय रस्ता सुरक्षा आढावा समिती बैठकीत ठरल्याप्रमाणे आमदार भास्करशेठ जाधव यांनी एक तास उन्हामधे उभे राहून शौकत मुकादम व संबंधित लोकांकडून मुंबई गोवा महामार्गाच्या समस्या जाणून घेतल्या चिपळूण,खेड तालुक्यातील पंधरागाव व चिपळूण तालुक्यातल्या गावातील मुंबई गोवा महामार्गावरील कळंबस्ते येथे भुयारी मार्ग करण्यात आला आहे तो चुकीचा आहे त्याचा भयंकर त्रास वरील सर्व गावातील जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना होणार आहे या साठी सोयीस्कर मार्ग काढण्यासाठी आ.भास्करशेठ जाधव यानी संबधीत अधिकाऱ्यांना कडक भाषेत सुचना दिल्या आहेत यावेळेस खेड व चिपळूण तालुक्यातील सुमारे २०० पेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
संबधीत अधिकाऱ्यांना सदरचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याच्या सुचना केल्या सुचवलेली कामे मार्गस्थ लागली आहेत की नाही पहाण्यासाठी मी परत येणार आहे चिपळूण संगमेश्वर विधान सभेचे आ.शेखरजी निकम यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत व वरील समस्या ते अधिकाऱ्याकडून माहीती करून घेणार आहेत. यावेळी कळंबस्ते ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच विकास गमरे उपसरपंच गजानन महाडीक ग्रामपंचायत सदस्य विवेक महाडीक अंकुश शि गवण रसिका तोणदेकर मिना पवार सुरेखा भुवड प्रणाली सावंत अशिता जाधव यानी आ.भास्करशेठ जाधव यांचे स्वागत केले.
यावेळी चिपळूण चे उपविभागीय अधिकारी पवार साहेब हायवेचे अधिकारी व ठेकेदार कंपनीचे अधिकारी,माजी सभापती शौकत मुकादम मा.जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव तालुकाध्यक्ष जयंत खताते विधान सभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी शहराध्यक्ष मिलिंद कापडी फैसल कास्कर बी.डी.शिंदे गुहागर तालुकाध्यक्ष संदीप सावंत माजी सरपंच चंद्रकांत सावंत आशा राक्षे आदील मुकादम दिपक महाडीक संदीप वेतोस्कर प्रकाश भोज सुनिल झगडे आर.जी.कुलकर्णी कासम कोंडेकर खालिद पटाईत,विजय जाधव जयसिंग सावंत अक्तर मुकादम बशीर चिकटे कादीर मुकादम पापा कोळंबेकर सचिन शिंदे आमदार निकमसर याचे स्विस सहाय्यक रुपेश ईगवले संजय गमरे सुरेश खेराडे प्रेमानंद शिगवण मुराद काणेकर पांडुरंग खांडेकर संजय जाधव रघुनाथभाऊ कारंडे दिपक शिंदे महीपत कदम म्हात्रे साहेब संतोष शिगवण समीर चिकटे,फद चिकटे दशरथ जाधव,ओमकार सप्पाल,सचिन गमरे,व पेढे गणातील अनेक मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी माजी मंत्री आमदार भास्करराव जाधव यानी मा.सभापती शौकत मुकादम यांच्या निवासस्थानी सदिच्छाभेट दिली त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले.