Petrol Diesel Rate In Maharashtra : पेट्रोल- डिझेलच्या किंमती वाढल्या की कमी झाल्या? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
पेट्रोल आणि डिझेल हा सामान्यांचा खिशाला खात्री देणारा विषय आहे. अनेकांचे महिन्याचे बजेट हे पेट्रोल आणि डिझेल किमंतीवर अवलंबून असते. 19 मे 2025 म्हणजेच आजच पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. तेल विपणन कंपन्या (OMCs) दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सुधारतात, जे जागतिक कच्च्या तेलाच्या किमती आणि चलन विनिमय दरांमधील चढउतार प्रतिबिंबित करतात. हे नियमित अपडेट पारदर्शकता सुनिश्चित करतात आणि ग्राहकांना सर्वात अचूक आणि अद्ययावत इंधन किमतीची माहिती प्रदान करतात, जाणून घेऊया नक्की काय आहेत किमंती?
बीड (Beed) पेट्रोल 105.44 डिझेल 91.93
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) पेट्रोल 105.18 , डिझेल 91.68
नांदेड (Nanded) पेट्रोल 105.50, डिझेल 92.03
धाराशिव (Dharashiv) डिझेल 105.39, डिझेल 91.89
रायगड (Raigad), पेट्रोल 104.78, डिझेल 91.26
रत्नागिरी (Ratnagiri), पेट्रोल 105.50, डिझेल 92.03
सांगली (Sagali) , पेट्रोल 104.50, डिझेल 91.03
सिंधुदुर्ग (Sindhudurg) पेट्रोल 105.50, डिझेल 92.03
सोलापूर (Solapur), पेट्रोल 104.20, डिझेल 90.75
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार होत असून त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते. तर आजच्या दरांनुसार पेट्रोल व डिझेलचे महाराष्ट्रातील दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते.