मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांचं आश्वासन म्हणाले...

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांचं आश्वासन म्हणाले...

आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती होती.
Published by :
Siddhi Naringrekar

आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या.

मुख्यमंत्री म्हणाले की, रस्ते आणि रेल्वे मार्गाने मराठवाड्याला जोडण्यासाठीची विकासकामंही वेगानं व्हावीत, यासाठी भरीव तरतूद केली आहे. औरंगाबादमधील वेरूळ मंदिरासाठी १३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार. जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार. मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प हाती घेणार. जालना पाणीपुरवठा नूतनीकरण. नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देणार. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये घृणेश्वर मंदिराच्या विकासासाठी १५७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचे सांगतिले. लातूरमध्ये कृषी महाविद्यालयाची तरतूद. मराठवाडा वाटर ग्रीडमधून लातूरसाठी मान्यता दिली जाणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

यासोबतच मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी होऊन आपले रक्त सांडणाऱ्या सर्वच ज्ञात अज्ञात वीरांना त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल विनम्रतापूर्वक अभिवादन. हा लढा सोपा नव्हता. मात्र, रझाकारीच्या जोखडातून स्वतःची मुक्तता करून स्वातंत्र्याची पहाट अनुभवण्यासाठी या वीरांनी जे बलिदान दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांच्या बलिदानातून स्वतंत्र झालेल्या मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढू, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. देत त्यांनी यावेळी विविध घोषणा केल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com