Chhgan Bhujbal : अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार? छगन भुजबळ यांनी सांगूनच टाकलं

Chhgan Bhujbal : अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार? छगन भुजबळ यांनी सांगूनच टाकलं

पवार काका-पुतण्यांच्या युतीवर बोलताना छगन भुजबळ म्हणाले आहेत की, पवारांना एकत्र येण्यासाठी मध्यस्थीची गरज नाही.
Published by :
Prachi Nate
Published on

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांनी लोकशाही मराठीसोबत चर्चा केली. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणावर मंत्री छगन भुजबळांनी वक्तव्य केलं आहे. त्याचसोबत महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात पॉवरफुल्ल घराणी म्हणून पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब ही दोन असल्याचं ते म्हणाले आहेत.

पण सध्या या दोन्ही घरात राजकीय फूट पडली असून ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या, आणि पवार काका-पुतण्यांच्या युतीची चर्चांनी जोर धरल्याच पहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर छगन भुजबळ लोकशाही मराठी सोबत बोलताना आपली रोखठोक आणि मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे.

दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच, पण पवारांना एकत्र येण्यासाठी मध्यस्थीची गरज नाही, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. तसेच राजकारणात कधी काय बदलेल सांगता येत नाही, असं महत्त्वाचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com