Strawberry Moon 2025 : आज आकाशात चंद्राचे गुलाबी रूप! तब्बल 18 वर्षांनी पहायला मिळणार स्ट्रॉबेरी मून
जून महिन्याच्या शेवटच्या पौर्णिमेला म्हणजे जेष्ठ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज रात्री 7 नंतर आकाशात चंद्राचे गुलाबी रूप पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज दिनांक 11 जूनच्या रात्री आकाशात हा एक दुर्मिळ क्षण पाहायला मिळणार आहे. ही एक अद्भुत खगोलीय घटना आहे. खगोल शास्त्रज्ञांसाठी आणि आकाशप्रेमींसाठी हा खूप अद्वितीय क्षण असणार आहे.
आज रात्री आकाशात पूर्णं चंद्र दिसणार आहे आणि त्याला एक छान गुलाबी छटा असणार आहे. त्यामुळे त्याला ‘स्ट्रॉबेरी मून’ असे देखील म्हंटले जाते. अशी संधी दर 18.6 वर्षांनी एकदाच येते. त्यामुळे आजचा चंद्रप्रकाश दुर्मिळ ठरणार आहे. या आधी असा गुलाबी छटा असलेला चंद्र 2005 मध्ये दिसला होता, त्यानंतर असा चंद्र पाहण्याची संधी 2043 मध्ये मिळेल. या काळात, चंद्राची गती आणि स्थिती अशी असते की तो पृथ्वीपासून तुलनेने दूर आणि क्षितिजाच्या अगदी जवळ दिसतो, ज्यामुळे त्याच्या तेजात एक उबदार, सोनेरी आभा दिसते.
यावेळी हा चंद्र 'सूक्ष्म चंद्र' असेल म्हणजेच जेव्हा चंद्र पृथ्वीपासून सर्वात दूर अंतरावर असेल. यामुळे चंद्र थोडा लहान आणि कमी तेजस्वी दिसेल.आणि चंद्रावर त्यावेळी एक गुलाबी छटा पाहायला मिळणार आहे. तस पाहता या काळात स्ट्रॉबेरी फळांची कापणी होत असल्यामुळे जुन्या अमेरिकन स्थानिक जमातींकडून या मुन ला स्ट्रॉबेरी मून’असे नाव देण्यात आले. ही खगोलीय घटना आज रात्री 7नंतर आकाशात स्पष्टपणे पाहता येणार आहे, उघड्या डोळ्यांनी किंवा दुर्बिणीतून याचा अनुभव घेता येऊ शकतो.