Holi Hain! धुळवडीनिमित्त चिकन, मटण खरेदीसाठी खवय्यांची तुफान गर्दी, ...

राज्यात होळीच्या सणानिमित्त खवय्यांची मटण, चिकन खरेदीसाठी तुफान गर्दी. धुळवडीच्या दिवशी मटणाचा भाव 780 रुपये किलो झाला आहे. जाणून घ्या सविस्तर!
Published by :
Team Lokshahi

राज्यात होळीचा सण जोरदार सुरु आहे. सर्वत्र रंगाची उधळण पाहायला मिळते आहे. धुळीचा सण असल्याने अनेकजण मासांहाराचा बेत आखतात. आज शुक्रवार धुळवड आल्याने तसेच सलग तीन दिवस सुट्टी असल्याने खवय्याचे पाय मटण- चिकनच्या दुकानांकडे वळले आहेत. आज मटणाचा भाव 780 रुपये असून सकाळपासूनच चिकन, मटणाच्या दुकानांवर बाहेर खवय्याची गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी चिकन मटनांच्या दुकानाबाहेर अर्ध्या किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांची वाढलेली संख्या पाहता सध्या मटणाचा भाव 780 रुपये किलो झाला आहे. तरी देखील नागरिक रांगा लावून मटण खरेदी करताना दिसून येत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com