Ujani Dam : स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंग्याच्या रोषणाईने उजळले उजनी धरण

Ujani Dam : स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंग्याच्या रोषणाईने उजळले उजनी धरण

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त उजनी धारणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
Published by  :
Team Lokshahi

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त उजनी धारणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सध्या या धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने रात्रीच्या वेळी धरणाची रोषणाई पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त उजनी धारणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी या सांडव्यावर सोडण्यात आलेल्या तीन रंगाच्या रोषणाईमुळे धरण जणू भारतीय ध्वज असल्यासारखा भास होतो. पहिल्यांदाच या प्रकारे धरणाला रोषणाई करण्यात आली आहे. या धरणाचे व्हिडिओ आणि फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी हे धरण पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत.

आज देशभरात 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. या निमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उजनी धरणावर तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन आहे. या स्वातंत्र्यदिनाची मोठी तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त उजनी धरण तिरंगी विद्युत रोषणाईने नटले आहे. उजनी धरणावर आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाईने केल्यानं धरण परिसरात चैतन्यमय वातावरण आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचे आजोन करण्यात आलं आहे. देशभर आज स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. उजनी धरण हे महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत उजनी धरणावर या सोळा दरवाज्यावर तिरंग्याचा आकर्षक विद्युत रोषणाई आज पासून करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईमुळे सायंकाळी व रात्रीच्या वेळी मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे. याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. धरणावर पहिल्यांदाच अशा पध्दतीने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com