Makar Sankranti : संक्रांतीचा गोड बेत! घरच्या घरी बनवा रसाळ मालपुआ; सोपी रेसिपी एका क्लिकवर

Makar Sankranti : संक्रांतीचा गोड बेत! घरच्या घरी बनवा रसाळ मालपुआ; सोपी रेसिपी एका क्लिकवर

Makar Sankranti : मकरसंक्रांत हा सण देशभरात विविध परंपरांनी साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात.
Published by :
Riddhi Vanne
Published on

मकरसंक्रांत हा सण देशभरात विविध परंपरांनी साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात. काळ्या रंगाचे कपडे, सुगड पूजन, हळदीकुंकू आणि गोडधोड हे या सणाचे खास आकर्षण असते. तिळगुळाबरोबरच वेगवेगळे गोड पदार्थ घरोघरी तयार केले जातात.

याच सणानिमित्त आज आपण अगदी कमी साहित्यात तयार होणारा, मऊ आणि रसाळ मालपुआ कसा बनवायचा ते पाहूया. हा पदार्थ झटपट होतो आणि सगळ्यांनाच आवडतो.

लागणारे साहित्य

मैदा, साखर, वेलची पूड, तूप, आवडीनुसार सुका मेवा

सोपी कृती

  • सर्वप्रथम साखर आणि पाणी एकत्र करून पाक तयार करा. त्यात वेलची पूड आणि थोडं केशर घाला.

  • एका भांड्यात मैदा घ्या आणि हळूहळू पाणी घालून घट्टसर पीठ तयार करा. मिश्रण गुळगुळीत असू द्या.

  • आता तवा गरम करून त्यावर तूप लावा. तयार पीठ ओतून लहान गोल मालपुए घाला. दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.

  • गरम मालपुए थेट पाकात बुडवून घ्या आणि वरून काजू-बदाम घालून सर्व्ह करा.

  • घरच्या घरी तयार झालेला हा गोड पदार्थ मकर संक्रांतीचा आनंद अधिकच वाढवेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com