Navratri 2025 Mumba Devi : नवरात्रोत्सवानिमित्त जाणून घ्या मुंबईची आराध्य दैवत मुंबादेवीवरुन मुंबई हे नाव कसं पडलं?

Navratri 2025 Mumba Devi : नवरात्रोत्सवानिमित्त जाणून घ्या मुंबईची आराध्य दैवत मुंबादेवीवरुन मुंबई हे नाव कसं पडलं?

आज 22 सप्टेंबर, आजपासून अश्विन शुक्ल प्रतिपदा, शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. यादरम्यान तुम्हाला माहित आहे. मुंबादेवीच्या नावावरून बॉम्बेला मुंबई हे नाव कसं पडलं?
Published by :
Prachi Nate
Published on

आज 22 सप्टेंबर, आजपासून अश्विन शुक्ल प्रतिपदा, शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. तू दिल के दर्या कि राणी ... लहेरे है तेरी तूफानी असं जीच वर्णन केलं जात ती म्हणजे स्वप्ननगरी मुंबई... आपली स्वप्न उराशी बाळगून हीच्या कुशीत सामावणा-या प्रत्येकाला यथाशक्ती वरदान देणारी ही मुंबई आणि या मुंबईची वरदायनी अर्थात मुंबादेवी. मुंबादेवी ही मासे पकडणाऱ्या कोळ्यांची देवता होती.

मुंबादेवी मंदिर सहा शतके जुने आहे. पहिले मुंबादेवी मंदिर बोरी बंदर येथे होते आणि 1739 ते 1770 दरम्यान ते उद्ध्वस्त झाल्याचे समजले. जेव्हा इंग्रजांनी तेथे व्हिक्टोरिया टर्मिनस हे रेल्वे स्टेशन बांधायचे ठरवले तेव्हा बांधकामाला अडथळा ठरलेले ते देऊळ त्यांनी काढून टाकले आणि मुंबईच्या काळबादेवी-भुलेश्वर भागात मुंबादेवीचे सध्याचे मंदिर बांधून दिलं.

मुंबईची ग्रामदेवता मुंबईचं नाव मुळात मुंबादेवी या देवीवरून पडलं आहे. मात्र तुम्हाला माहित आहे. मुंबादेवीच्या नावावरून बॉम्बेला मुंबई हे नाव कसं पडलं? 'मुंबा' हा शब्द 'महा' म्हणजेच महान आणि 'अंबा' हा शब्द आई या शब्दांपासून तयार झाला आहे. या शब्दाला जोडले तर त्याचा अर्थ 'महान आई' असा होतो.

कोळी लोक देवीला आपले संरक्षक मानत होते आणि त्यांच्या वस्तीच्या ठिकाणी असलेल्या मंदिरावरून या शहराला 'मुंबई' हे नाव मिळाले. परोपकारी देवी मुंबा, चांदीच्या वस्त्रांनी परिधान केलेली आहे आणि नाक अलंकारित आहे. ती मुंबईची प्रतिष्ठित देवता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com