पैठण घुमला डीजेचा दणदणाट; पोळा सणानिमित्त शेतकऱ्यांनी काढली सर्जा-राजाची मिरवणूक

पैठण घुमला डीजेचा दणदणाट; पोळा सणानिमित्त शेतकऱ्यांनी काढली सर्जा-राजाची मिरवणूक

वर्षभर कष्टाचं काम करून बळीराजाला इमाने इतबारे साथ देणाऱ्या बैलांची सेवा करण्याचा सण म्हणजे पोळा.
Published on

सुरेश वायभट | पैठण: वर्षभर कष्टाचं काम करून बळीराजाला इमाने इतबारे साथ देणाऱ्या बैलांची सेवा करण्याचा सण म्हणजे पोळा. यंदा मुबलक पाऊस झाल्याने बळीराजाच्या आनंदात भर पडल्याने पैठण तालुक्यातल वडवाळी येथील तरुण शेतकऱ्यांनी सर्जा राजाची डीजेच्या तालावर फटाक्यांच्या अतिषबाजीमध्ये गावातुन मिरवणूक काढण्यात आली.

पोळा सणाच्या दिवशी बैलांना विश्रांती दिली जाते. बैलांची खांदेमळणी अर्थात गरम पाण्याने बैलांचे खांदे शेकले जातात. बैलांच्या शिंगाना रंगरंगोटी करून रंगीबेरंगी गोंडे बांधले जातात. पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो आणि बैलांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली जाते.

आतापर्यंत पोळा सण अशा पारंपारिक पद्धतीने साजरा केला जात असे. मात्र, पोळा सणाचं स्वरूपही आता बदलत चालल्याचा प्रत्यय पैठण तालुक्यातील वडवाळी येथील मिरवणुकीत आला. वडवाळी येथील शेतकरी दरवर्षी पोळ्याच्या दिवशी बैलांची सवाद्य मिरवणूक काढतात. मात्र तरुण शेतकऱ्यांनी यंदाच्या मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांऐवजी चक्क डीजेच्या तालावर फटाक्याची अतिषबाजी करत गावातुन बैलाची मिरवणुक काढण्यात आली या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com