उदयनराजेंच्या मेळाव्यात 762 जणांना 'ऑन दि स्पॉट' नोकरी
Admin

उदयनराजेंच्या मेळाव्यात 762 जणांना 'ऑन दि स्पॉट' नोकरी

खासदार उदयनराजे भोसले यांचा पुढाकार आणि संकल्‍पनेतून आयोजित महारोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्यात आले होते.
Published by :
Siddhi Naringrekar

खासदार उदयनराजे भोसले यांचा पुढाकार आणि संकल्‍पनेतून आयोजित महारोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबतच इनोव्‍हेटिव्‍ह सातारा हा उपक्रम राबविण्‍यात येत आहे. या मेळाव्‍याचे उद्‌घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्‍ते झाले.

यावेळी पहिल्‍याच दिवशी ७६२ जणांना ऑन दि स्‍पॉट नोकरीचे नियुक्तिपत्र देण्यात आले. युवकांच्‍या नावनोंदणीसाठी स्‍वतंत्र कक्ष उभारण्‍यात आला होता. यात दिवसभरात ५ हजार ६०० युवक-युवतींची नोंदणी झाली. यावेळी युवकांनी उद्योजक बनावे, यासाठी आवश्‍‍यक त्‍या उपाययोजना शासन राबवत असून, आगामी काळात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढवणार असल्‍याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

माझी धडपड आणि माझ्‍या हृ‌दयातील धडधड ही फक्‍त सातारकरांसाठी, युवकांसाठी आणि विकासासाठी सुरू आहे.जमिनीचा सातबारा हा माझ्‍यासाठी कागदी तुकडा आहे. खरा सातबारा हा समोर बसलेला युवक आणि युवती आहेत. असे उदयनराजे भोसले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com