DMart मध्ये 'या' दिवशी वस्तू कमी किंमतीत मिळतात

DMart मध्ये 'या' दिवशी वस्तू कमी किंमतीत मिळतात

DMart विकेंड सेल: शुक्रवार ते रविवार विशेष सूट, हजारो ग्राहकांची गर्दी.
Published by :
Riddhi Vanne

DMart मध्ये खरेदी करणं म्हणजे दर्जेदार वस्तू कमी किंमतीत मिळवण्याची खात्री. हजारो ग्राहक दर महिन्याला इथून धान्य, मसाले, कपडे, आणि रोजच्या गरजेचं सामान खरेदी करतात. पण बहुतेकांना हे माहित नसेल की, DMart मध्ये काही खास दिवस असतात, जेव्हा सामान इतर दिवसांच्या तुलनेत आणखी स्वस्त दरात मिळतं. DMart हे नेहमीच MRP पेक्षा कमी दरात वस्तू विकतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण या रिटेल साखळीमध्ये विशिष्ट दिवशी 'बाय वन, गेट वन फ्री' किंवा 'क्लीन-अप डिस्काउंट' सारख्या ऑफर्स मिळतात. जाणून घेऊया, हे खास दिवस कोणते आहेत.

1. 1. विकेंड सेल Weekend Sale  (शुक्रवार ते रविवार)

DMart मध्ये 'या' दिवशी वस्तू कमी किंमतीत मिळतात

शुक्रवारपासून रविवारपर्यंत DMart मध्ये ‘वीकेंड सेल’ असतो. यावेळी FMCG, ग्रोसरी, कपडे, आणि ब्यूटी प्रॉडक्ट्स यासारख्या अनेक श्रेणींवर विशेष सूट मिळते. काही स्टोअर्समध्ये 'Buy 1 Get 1 Free' ऑफर्सही दिल्या जातात. ग्राहकांची गर्दीही याच काळात सर्वाधिक असते.

2. 2. सोमवारचा ‘क्लीन-अप डिस्काउंट Clean-up Discount ’

DMart मध्ये 'या' दिवशी वस्तू कमी किंमतीत मिळतात

रविवारी विक्री झाल्यावर काही स्टोअर्समध्ये सोमवारी स्टॉक क्लिअरन्ससाठी निवडक वस्तूंवर अधिक सूट दिली जाते. मात्र, ही ऑफर प्रत्येक सोमवारी असतेच असं नाही.

3. 3. DMart Ready अ‍ॅपवरील डील्स

DMart मध्ये 'या' दिवशी वस्तू कमी किंमतीत मिळतात

DMart चं ऑनलाइन अ‍ॅप, DMart Ready वापरणाऱ्यांसाठीही काही खास ऑफर्स असतात. सोमवार किंवा बुधवार या दिवशी अ‍ॅपवरून खरेदी केल्यास कूपन किंवा विशेष सवलती मिळू शकतात.

4. 4. सणांच्या दिवशी विशेष ऑफर्स

DMart मध्ये 'या' दिवशी वस्तू कमी किंमतीत मिळतात

दिवाळी, होळी, नाताळ, नवीन वर्ष अशा सणांच्या काळात DMart मध्ये मोठ्या प्रमाणावर सूट दिली जाते. सणाच्या काळात खरेदी केल्यास वस्तू नेहमीपेक्षा खूप कमी किंमतीत मिळतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com