Crime News
Crime NewsTeam Lokshahi

नांदेडमध्ये भीमजयंतीला गालबोट; नाचण्याच्या वादातून तरुणाची चाकुने भोसकून हत्या

दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक; प्रकरणातील एक जण गंभीर जखमी आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

नांदेड प्रतिनिधी | कमलाकर बिरादार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2022) निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला गालबोट लागल्याचा प्रकार काल नांदेड (Nanded) शहरात घडला आहे. नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाचा चाकुने भोसकून खून (Assassination) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याच प्रकरणातील एक जण गंभीर झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. ही घटना काल रात्री उशिरा शहरातील वसंतराव नाईक कॉलेजच्या समोर घडली आहे.

Crime News
संगमनेरमध्ये भीमजयंतीला गालबोट; 125 जणांवर गुन्हा दाखल

सचिन थोरात असं खुन झालेल्या तरुणाचं नाव असून, सुमेध वाघमारे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. किशोर ठाकूर आणि आदिल शेख हे दोघे मिरवणूकीत नाचून अडथळा निर्माण करत असल्याने सचिन आणि सुमेधने त्यांना मिरवणुकीत नाचण्यास विरोध केला. हा राग मनात धरुन किशोर ठाकूर आणि आदिल शेख याने सचिन आणि सुमेधवर चाकुने हल्ला केला. या घटनेनंतर दोघेही फरार झाले होते. दोघांनाही उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. यावेळी सचिनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Crime News
डझनभर गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार पापा हड्डीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

दरम्यान, सुमेधवर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी किशोर ठाकूर आणि आदिल शेख विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com