One Nation One Charger : मोदी सरकारचे 'एक देश, एक चार्जर' धोरण

One Nation One Charger : मोदी सरकारचे 'एक देश, एक चार्जर' धोरण

आम्ही बऱ्याच काळापासून ऐकत आहोत की लवकरच सर्व उपकरणांसाठी चार्जर पॉलिसी येणार आहे.

आम्ही बऱ्याच काळापासून ऐकत आहोत की लवकरच सर्व उपकरणांसाठी चार्जर पॉलिसी येणार आहे. आता तुम्हाला तुमच्या लॅपटॉप, स्मार्टफोन आणि टॅबलेटसाठी वेगळ्या चार्जरची गरज भासणार नाही. याचा एक फायदा असा होईल की कुठेही प्रवास करताना तुम्हाला तुमच्या फोन, टॅबलेट किंवा लॅपटॉपचा चार्जर सोबत ठेवावा लागणार नाही. मोबाईल फोन आणि इतर पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी युनिव्हर्सल चार्जरचा वापर शोधण्यासाठी सरकार तज्ञ समित्या स्थापन करत आहे. त्यानंतर दोन महिन्यांत संपूर्ण अहवाल सादर होणे अपेक्षित आहे.

याप्रकरणी मंत्रालयाने माहिती दिली आहे. सचिव रोहित कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. आता फायनल चार्जर ठरवण्यासाठी एक टीम बनवली आहे. या ठिकाणी टाइप सी किंवा अन्य चार्जर वरून निर्णय अद्याप झाला नाही. मोबाइल पासून लॅपटॉप पर्यंत एक कॉमन चार्जिंग पोर्ट जारी करायला हवे असे एकमताने ठरले आहे.

बैठकीत सहभागी झालेल्या अनेकांनी स्मार्टफो, लॅपटॉप, आणि अन्य काही गॅझेटसाठी USB Type-C वर सहमती दर्शवली आहे. तर फीचर्स फोनसाठी वेगळे चार्जर असायला हवे, असा सल्ला दिला आहे. वापरकर्त्यांसाठीही खूप फायदेशीर ठरेल. एक चार्जर पॉलिसी पूर्णपणे मंजूर केली जाऊ शकते. किमान तेच अपेक्षित आहे.त्याच वेळी, मूळ उपकरण निर्मात्याने प्रदान केलेले चार्जर किंवा चार्जिंग कॉर्ड महाग असू शकते.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com