OnePlus Nord 5 : वनप्लसची नवी उत्पादने जागतिक बाजारपेठेत दाखल; स्मार्टफोनसह इअरबड्स, टॅबलेट, पॅड आणि स्मार्ट वॉच लाँच

OnePlus Nord 5 : वनप्लसची नवी उत्पादने जागतिक बाजारपेठेत दाखल; स्मार्टफोनसह इअरबड्स, टॅबलेट, पॅड आणि स्मार्ट वॉच लाँच

वनप्लसने यंदा नवनवीन उत्पादने जागतिक बाजारपेठेमध्ये लाँच केली असून त्यासंदर्भात एक जागतिक कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला होता.
Published by :
Team Lokshahi
Published on

वनप्लसने यंदा नवनवीन उत्पादने जागतिक बाजारपेठेमध्ये लाँच केली असून त्यासंदर्भात एक जागतिक कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वनप्लसने नुकतेच भारताबाहेर OnePlus Nord 5 आणि Nord CE 5 स्मार्टफोन लाँच केले आहेत. सोबतच, OnePlus Buds 4 हे इयरबड्सदेखील लाँच झाले आहेत. OnePlus नं आपला नवीन टॅबलेट, OnePlus Pad Lite आणि smart watch युरोपातील काही देशांमध्ये लाँच केला आहे. वनप्लसने फोन आणि इअरबड्ससोबत आता टॅबलेट आणि एक स्मार्टवॉच क्षेत्रातही दमदार पदार्पण केले आहे.

वनप्लसने आपला प्रभाव युरोपियन देशांवर प्रस्थापित करण्यासाठी जागतिक कार्यक्रमाच्या अधिकृत टीझरमध्ये नॉर्ड 5, नॉर्ड सीई 5 आणि बड्स 4 टीडब्ल्यूएस इअरबड्स बरोबरच वनप्लसची आणखी दोन उत्पादने दाखवण्यात आली. वनप्लसने एक नवीन टॅबलेट आणि एक स्मार्टवॉच लाँच केले आहे. वनप्लस पॅड 2 आणि वनप्लस वॉच 3 ही त्यांची नवीन उत्पादने आहेत.

वनप्लस पॅड 2

या टॅबलेटमध्ये 11 इंचाचा LCD डिस्प्ले, 9,340mAh बॅटरी, आणि 33W फास्ट चार्जिंगसह अनेक आकर्षक फीचर्स आहेत. MediaTek Helio G100 प्रोसेसर आणि 8GB पर्यंत रॅमसह हा टॅबलेट Wi-Fi आणि LTE कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. वनप्लस पॅड 2 हा एक शक्तिशाली आणि अष्टपैलू अँड्रॉइड टॅबलेट आहे.

वनप्लस वॉच 3

वनप्लस वॉच 3 हे एक स्मार्टवॉच आहे जे उत्तम बॅटरी लाईफसाठी ओळखले जाते. या घड्याळात स्नॅपड्रॅगन W5 आणि BES 2800 चिपसेट वापरले आहेत, ज्यामुळे उर्जा व्यवस्थापन उत्तम आहे.या घड्याळात 500mAh ची बॅटरी आहे.वनप्लस वॉच 3 मध्ये 1.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे.यात OnePlus ची सिलिकॉन नॅनोस्टॅक बॅटरी आहे, जी उत्कृष्ट बॅटरी लाईफ देते.

सध्या भारतात याच्या लाँचबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु युरोपात प्री-ऑर्डर सुरू झाल्या आहेत. येत्या काळात हा टॅबलेट आणि वॉच भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. आम्ही आमच्या भारतीय ग्राहकांना आमच्या वनप्लस तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असला तरी सध्या OnePlus Watch 3 आणि टॅबलेट सध्या भारतात लाँच केला जाणार नाही. भारतात हे प्रॉडक्ट्स लाँच करण्यापूर्वी आम्हाला भारतीय बाजारपेठेचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे. तसेच वनप्लसला वाटते की त्यांना नवीन बेंचमार्क सेट करणारी उत्पादने बनवण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तसेच भारतीय बाजारपेठेचा विचार करता यावर्षी फोल्डेबल डिवाइस लाँच न करण्याचा निर्णय घेतल्याचे वनप्लसने जाहीर केले आहे.

हेही वाचा

OnePlus Nord 5 : वनप्लसची नवी उत्पादने जागतिक बाजारपेठेत दाखल; स्मार्टफोनसह इअरबड्स, टॅबलेट, पॅड आणि स्मार्ट वॉच लाँच
Teachers Protest : अधिवेशन संपेपर्यंत शिक्षकांच्या खात्यात जमा होणार इतका पगार; गिरीश महाजन यांनी दिले आश्वासन
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com