आजपासून कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू
Admin

आजपासून कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू

आजपासून कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू होणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आजपासून कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू होणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीतही कांद्याचे लिलाव बंद होते. कांद्याचे दर कोसळले होते. त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते.

यावरुन शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मार्ग सोडविला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, आठवडाभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटना यांच्या प्रतिनिधीची चर्चा केली जाईल. असे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com