Onion Price Hike : टोमॅटोनंतर आता कांदाही  होणार महाग; जाणून घ्या भाव किती वाढणार

Onion Price Hike : टोमॅटोनंतर आता कांदाही होणार महाग; जाणून घ्या भाव किती वाढणार

महागाईचा वाढता आलेख पाहायला मिळतो आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

महागाईचा वाढता आलेख पाहायला मिळतो आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. या महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. यातच आता टोमॅटोनंतर कांदाही महागणार असल्याची माहिती मिळत आहे. व्यापाऱ्यांना कांद्याच्या भावाची चिंता लागली आहे. या महिन्याच्या अखेरीस किरकोळ बाजारात कांद्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कांदा 30 रुपये किलोने बाजारात विकला जातोय. तो 40 रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे याचा परिणाम जेवणाच्या थाळीवरही झाला आहे.

येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढणार आहेत. कांदा येत्या काही दिवसांत 35 ते 40 रुपये प्रतिकिलो होऊ शकतो. पावसाचा कांद्यावर परिणाम झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये आता चिंतेचे वातावरण आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com