Onion Price Hike: कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल 'एवढ्या' रुपयांनी वाढ

Onion Price Hike: कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल 'एवढ्या' रुपयांनी वाढ

किमान निर्यातमूल्याच्या बंधनातून मुक्तता आणि निर्यातशुल्क निम्म्याने कमी झाल्यामुळे शनिवारी जिल्ह्यातील घाऊक बाजारात कांद्याचे प्रतिक्विंटलचे दर 500 रुपयांनी उंचावले.
Published on

किमान निर्यातमूल्याच्या बंधनातून मुक्तता आणि निर्यातशुल्क निम्म्याने कमी झाल्यामुळे शनिवारी जिल्ह्यातील घाऊक बाजारात कांद्याचे प्रतिक्विंटलचे दर 500 रुपयांनी उंचावले. शनिवारी लासलगाव बाजारात चांगल्या प्रतिच्या कांद्याला सरासरी 4700 रुपये दर मिळाले.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कांद्याचे भाव 3000 रुपयांवर गेल्याने सरकारने निर्यातबंदी लागू केली होती. आता दर 4000 च्या पुढे असतानाही निर्बंध हटविण्यामागील समीकरणे लक्षात घेतली जात आहेत. लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादकांच्या भागात मतदानावेळी सरकारने निर्यात बंदी उठवली होती. परंतु, प्रतिमेट्रिक टन 550 डॉलर किमान निर्यातमूल्य आणि 40 टक्के निर्यातशुल्क यामुळे निर्यातीतील अडसर कायम होते.

Onion Price Hike: कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल 'एवढ्या' रुपयांनी वाढ
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्यभरात खाद्य तेलाच्या दरात प्रति किलो 'एवढ्या' रुपयांची वाढ

केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्याचे बंधन हटवत 40 टक्के निर्यातशुल्क 20 टक्क्यांवर आणले. याचा परिणाम जिल्ह्यातील घाऊक बाजारावर झाला. मे महिन्यात चाळीत साठवलेला कांदा पावसात बराचसा खराब झाला. त्यामुळे उत्पादकांकडे फारसा कांदा नाही. व्यापारी वर्गाची साठवणुकीची क्षमता अधिक आहे. त्यामुळे या निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना अधिक होणार असल्याकडे या क्षेत्रातील जाणकारांकडून लक्ष वेधले जाते. शनिवारी लासलगाव बाजार समितीत पाच हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यास सरासरी 4700 रुपये दर मिळाले. आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी याच बाजारात कांद्याला सरासरी 4200 रुपये क्विंटल भाव मिळाला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com