ITR FILING : आता दिवस उरले 3, आयटीआर भरायला उशिरा झाला भरल्यास काय होते
ITR FILING : आता दिवस उरले 3, आयटीआर भरायला उशिरा झाला भरल्यास काय होते जाणून घ्या... ITR FILING : आता दिवस उरले 3, आयटीआर भरायला उशिरा झाला भरल्यास काय होते जाणून घ्या...

ITR FILING : आता दिवस उरले 3, आयटीआर भरायला उशिरा झाला भरल्यास काय होते जाणून घ्या...

ITR फाइलिंग: 3 दिवस उरले, विलंब झाल्यास दंड आणि इतर परिणाम टाळा.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

आयटीआर भरण्यासाठी आता दिवस उरले तीन

185 सप्टेंबरला आयटीआर भरण्याची शेवटची मुदत आहे

रिटर्न न भरल्यास अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

वित्तीय वर्ष 2024-25 (असेसमेंट इयर 2025-26) साठी व्यक्तिगत करदात्यांना 15 सप्टेंबर 2025 ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. आता केवळ तीनच दिवस शिल्लक राहिल्याने ज्या करदात्यांनी अद्याप आपला आयकर विवरणपत्र (ITR) भरलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. कारण वेळेवर रिटर्न न भरल्यास अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

आयटीआर वेळेत न भरल्यास काय परिणाम होतो?

1. उशीर झाल्यास दंड आकारला जातो.

जर तुम्ही मुदतीनंतर रिटर्न भरला, तर बिलेटेड रिटर्न म्हणून तो स्वीकारला जातो. 31 डिसेंबर 2025 पर्यंत अशा प्रकारचा रिटर्न भरता येतो, मात्र त्यासाठी दंड आकारला जातो.

उत्पन्न जर 5 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल, तर ₹5,000 दंड.

उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असल्यास ₹1,000 दंड भरावा लागतो.

2. रिफंडमध्ये होतो विलंब.

वेळेवर रिटर्न भरल्यास कर रिफंड लवकर मिळतो. पण जर तुम्ही उशीर केला, तर त्या रक्कमेचा परतावा लांबतो.

3. कर्ज आणि व्हिसावर परिणाम.

ITR हे आर्थिक स्थैर्य दाखवणारे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, किंवा विदेशात जाण्याच्या व्हिसा प्रक्रियेत याचे महत्त्व असते. ITR वेळेवर न भरल्यास ही प्रक्रिया अडथळ्यांची ठरू शकते.

4. टॅक्सवरील व्याज भरावे लागते.

जर काही टॅक्स बाकी असेल आणि ITR वेळेवर फाईल केला नाही, तर त्या रकमेवर व्याज भरावे लागते, ज्यामुळे एकूण करभार वाढतो.

ITR फाइल करताना लागणारी महत्त्वाची कागदपत्रे:

फॉर्म 16 (नोकरीदारांसाठी)

फॉर्म 26AS

AIS (Annual Information Statement)

पॅन कार्ड आणि आधार कार्ड

गुंतवणूक संबंधित पुरावे (FD, PPF, होम लोनवरील व्याजाचे प्रमाणपत्र, विमा प्रीमियम यांची पावती)

ही सर्व कागदपत्रे हाताशी ठेवल्यास रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुलभ होते.

विलंब झाल्यास पर्याय काय?

अनेकांना त्यांच्या टीमकडे फोन करून विचारणा केली जात आहे की 15 सप्टेंबर नंतर रिटर्न भरता येतो का? यावर उत्तर आहे होय, पण तो बिलेटेड रिटर्न असतो आणि त्यासाठी दंड भरावा लागतो. त्यामुळे शक्य तितक्या लवकर आपला रिटर्न भरणं केव्हाही फायदेशीर ठरतं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com