Admin
बातम्या
ऑपरेशन 'कावेरी' सुदानमध्ये अडकलेले 2100 भारतीय सुखरुप परतले
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र खात्याकडून मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी राबवण्यात येत आहे.
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र खात्याकडून मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी राबवण्यात येत आहे. ऑपरेशन 'कावेरी' सुदानमध्ये अडकलेले 2100 भारतीय सुखरुप परतले आहे. आतापर्यंत 2100 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले असून आतापर्यंत 1600 नागरिक भारतात पोहचले आहेत.
परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर यांनी ट्विट करत माहिती दिली की, ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याचे काम सुरु आहे. 231 नागरिकांना सुखरुप परत घेऊन भारतीय वायुसेनाचे विमान नवी दिल्लीत पोहचले. असे त्यांनी सांगितले.
ऑपरेशन कावेरी अंतर्गत वायुसेनेच्या c-120J या विमानाने एका छोट्या हवाईपट्टीत विमान लँड करत 121 भारतीय नागरिकांचे प्राण वाचवले. आहेत. त्यात एक गर्भवती महिलेचाही समावेश आहे.