Operation Sindoor : भारतीय लष्करानं पाकिस्तानचं फायटर जेट JF-17 पाडलं

Operation Sindoor : भारतीय लष्करानं पाकिस्तानचं फायटर जेट JF-17 पाडलं

भारतीय सैन्यदलानं (Indian Army) पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भारतीय सैन्यदलानं (Indian Army) पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे. भारताविरोधात दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.

भारताकडून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor ) अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला. भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याच्या 15 दिवसांनी ही कारवाई केली.

याच पार्श्वभूमीवर आता अजून एक माहिती समोर येत आहे. भारतानं पाकिस्तानचं जेएफ 17 लढाऊ विमान (Fighter Jet JF 17) पाडल्याची माहिती मिळत आहे. चीनकडून पाकिस्तानने घेतलेलं हे जेएफ- 17 लढाऊ विमान होते. काश्मीरच्या पंपोर भागात पाकिस्तानचं हे जेएफ- 17 विमान पाडल्याची माहिती मिळत आहे.

या JF-17 ची लांबी सुमारे 14.9 मीटर, विंगस्पॅन 9.45 मीटर आणि उंची सुमारे 4.77 मीटर आहे. हे विमान 7 हार्डपॉइंट्सवर 1,500 किलोग्रामपर्यंत हत्यारांची नेआण करू शकतं. काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलानं पाडलेलं पाकिस्तानी लढाऊ विमान हे पाकिस्तानी (चीनी जेएफ-17) लढाऊ विमान आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com