Admin
बातम्या
महागाईच्या मुद्द्यांवरुन विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन
विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे.
विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. महागाईच्या मुद्द्यांवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन सुरु आहे. विरोधक सरकारला चांगलेच घेरण्याच्या तयारीत आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने करण्यात येत आहेत. गळ्यामध्ये वायर घालून त्यांचे आंदोलन सुरु आहे.
शेतकऱ्यांची वीजतोडणी बंद करा. वीजेवाचून पंप नाही, पंपावाचून पीक नाही, पीकावाचून मरतोय शेतकरी, सरकारला घेणं - देणं नाही. शेतकरीद्रोही सरकारचा धिक्कार असो अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन विरोधक आंदोलन करत आहेत.