ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अश्लील नृत्याचा प्रकार उघडकीस

ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अश्लील नृत्याचा प्रकार उघडकीस

१३ महिलाची सुटका, सांताक्रुज पोलिसांची मोठी कारवाई

रिध्देश हातिम|मुंबई: मुंबईतील सांताक्रुज पोलीस स्टेशनच्या हद्दीत लक्षद्वीप बार ॲन्ड रेस्टॉरंट या ऑकेस्ट्रा बारच्या आस्थापनेच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये गायिकांच्या नावाखाली महिलांकडुन विनापरवाना अश्लील नृत्य बारचे चालक, मालक, मॅनेजर, कॅशियर, कर्मचारी ऑकेस्ट्रा कलाकार गिन्हाईक हे करवून घेत असल्याची माहिती सांताक्रुज पोलिसांना गुप्तदारांकडून मिळाली.

सांताक्रुज पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी सदर बातमीची शाहनीशा करून एक पथक तयार केले आणि त्या ठिकाणी दोन पंच व पटंरसह रवाना करून आस्थापनेत प्रवेश केले असता, आस्थापनेत महिला ऑकेस्ट्रा स्टेजच्या खाली गिऱ्हाईकांसमोर उत्थान कपडयाच्या पेहराव्यामध्ये अश्लील नृत्य करतांना मिळुन आले व त्यांना आस्थापनेचे चालक, बार मॅनेजर, कॅशियर वेटर, हे अश्लील नृत्य प्रोत्साहित करत असतांना दिसुन आले.

या संपूर्ण कारवाईत 13 महिलांना त्यांचे प्रतिष्ठेचे संरक्षण जपणेकामी मुक्त करण्यात आले. तसेच कारवाईत रोख रक्कम रू १६,८००/- रू ऑक्सकेबल (किमंत अंदाजे ५००/-), १ अॅम्पलीफायर, (किमंत अंदाजे २३०००/-),१, स्पीकर (किमंत अंदाजे ८०००/-), असा मुद्देमाल तपासकामी जप्त करण्यात आले तसेच कारवाईमध्ये १ बार चालक, १ बार मॅनेजर, १ कॅशियर, ६ बेटर, ०९ ग्राहक यांना ताब्यात घेवून कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधिकारी व अमलंदार यांनी अतिशय कौशल्यपूर्वक अचानक धाड टाकून ऑर्केस्ट्रा बार चे नावाखाली चालत असलेला अश्लील नृत्याचा प्रकार उघडकीस आणुन १३ महिलाची सुटका करून मोलाची कामगीरी केली असून गुन्हयाचा तपास चालू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com