मुंबईतील स्थानिक अधिकाऱ्यांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश

मुंबईतील स्थानिक अधिकाऱ्यांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील स्थानिक अधिकाऱ्यांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याची माहिती दिली आहे.

तसेच पुढील काळात मुंबईत असे धोकादायक होर्डिंग दिसणार नाहीत याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com