भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त "शिवगर्जना" महानाट्याचे आयोजन

भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त "शिवगर्जना" महानाट्याचे आयोजन

भाजप व विशाल परब सेवा फाऊंडेशनच्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविले जाणार आहे.

प्रसाद पाताडे | सिंधुदुर्ग : भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथील नवीन एस. टी. बस आगार येथे शुक्रवार १७ मार्च रोजी सायं. ५ वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित शिवगर्जना हे महानाट्य होणार असल्याची माहिती भाजपचे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब व विशाल सेवा फाऊंडेशनचे विशाल परब यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजप व विशाल परब सेवा फाऊंडेशनच्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविले जाणार आहे. या उपक्रमापैकी कुडाळ येथे शिवगर्जना हे महानाट्य होणार आहे. यासंदर्भात कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, विशाल परब, सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, ओरोस मंडलचे अध्यक्ष दादा साईल, शिवगर्जना या महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्निल यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेमध्ये माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवगर्जना हे पहिल्यांदाच महानाट्य होत आहे. या महानाट्यानिमित्त भाजपचे नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला ही एक पर्वणीच असणार आहे असे त्यांनी सांगितले

शिवगर्जना हे महानाट्य सर्वांसाठी मोफत:- विशाल परब

तर विशाल परबसेवा फाउंडेशनचे विशाल परब यांनी सांगितले की, माजी खासदार निलेश राणे हे आमचे राजकीय गुरू आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम दरवर्षी आम्ही घेतो यावर्षी शिवगर्जना हे महानाट्य असणार आहे ७०० ते ८०० कलाकारांचा संच असलेले घोडे उंट हत्ती यांचा समावेश या नाटकांमध्ये दिसून येणार आहे सुमारे ६० ते ७० हजार नागरिक या महानाट्याला उपस्थित राहतील असा अंदाज आहे आणि तशा प्रकारे आम्ही व्यवस्था केली आहे हे महानाट्य विविध भाषांमध्ये आहे या ठिकाणी मराठी भाषेतून हे महानाट्य सादर होणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये या महानाट्याचे पासेस ठेवले जाणार आहेत. सर्व नागरिकांसाठी हे महानाट्य मोफत दाखविले जाणार आहे. असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगून या महानाट्यात स्थानिक कलाकारांना सुद्धा स्थान देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

उपक्रम कौतुकास्पद:- दिग्दर्शक स्वप्नील यादव

तर या महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव यांनी सांगितले की हे महानाट्य विविध भाषांमध्ये असून हा ८१ वा प्रयोग आम्ही करणार आहोत सर्व ठिकाणी हा नाट्य प्रयोग करत असताना आयोजकांनी प्रवेश शुल्क आकारले होते मात्र या ठिकाणी नागरिकांसाठी हे महानाट्य मोफत दाखविले जाणार आहे महाराजांचा इतिहास जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा हा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com