Wardha
WardhaTeam Lokshahi

अनाथ बालकाला मिळाले ‘स्विडन’ येथे हक्काचे पालक व घर

एक बालक लवकरच अमेरिकेत जाणा, जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते दत्तक विधान सुपुर्दर

भूपेश बारंगे, वर्धा: नवीन वर्ष अनाथ बालकांसाठी शुभदायक ठरले आहे. जिल्ह्यातील काही अनाथ बालकांना वर्षाच्या सुरुवातीलाच हक्काचे पालक व घर मिळाले आहे. यातील एक बालक नुकतेच आपल्या नव्या आई-बाबांसह स्विडनला रवाना झाले तर एक बालक लवकरच अमेरिकावासी होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या बालकांचे अंतीम दत्तक विधान नुकतेच सुपुर्द केले आहे.

बाल न्याय अधिनियमांतर्गत अनाथ, सोडुन दिलेले किंवा जमा केलेल्या बालकांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीच्या अधिन राहुन दत्तक विधानाची कार्यवाही करण्यात येते. संभाव्य दत्तक इच्छुक पालकांनी CARA.NIC.IN या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करायची असते. नोंदणी केल्यानंतर 30 दिवसांच्याआत पालकांमार्फत आवश्यक दस्ताऐवज पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक असते. पालकांनी गृह अभ्यास अहवालाकरीता जवळची विशेष दत्तक संस्था निवडणे अपेक्षित असते व सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर दत्तक ग्रहणाचे अंतिम आदेश दिले जातात. यापुर्वी न्यायालयामार्फत आदेश दिल्या जात होते. परंतु आता हे आदेश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पारित केले जाते.

दत्तक नियमावली नुसार न्यायालयासमोर प्रलंबित असलेले दत्तक प्रकरणाशी संबंधित सर्व प्रकरणे नवीन नियम लागू झाल्यापासून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आले. त्यात एकुण 10 प्रकरणांचा समावेश होता. जिल्ह्यामध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त दोन विशेष दत्तक संस्था कार्यरत असुन सदर संस्थांनी नवीन दत्तक नियमावली नुसार या बालकांचे परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे सादर केलेले होते.

त्याअनुषंगाने दत्तक ग्रहण समितीच्या निर्णयाच्या अधिन राहुन जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माध्यमातुन बालकांच्या व पालकांच्या दस्ताऐवजांची तपासणी करण्यात आली. सदर प्रस्ताव जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना अंतीम आदेशाकरीता सादर करण्यात आले होते. त्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीलाच बदललेल्या नियमावलीनुसार दत्तक विधानाचा पहिला अंतीम आदेश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पारित करण्यात आला. हा आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते स्विडन येथील पालकांना सुपुर्द करण्यात आला व एका अनाथ बालकाला नववर्षाच्या सुरुवातीला हक्काचे घर व पालक मिळाले.

जिल्ह्यात आतापर्यंत 6 देशांतर्गत व 2 देशाबाहेर असे एकूण 8 प्रकरणातील दत्तक विधानाचे अंतीम आदेश जिल्हाधिकारी श्री.कर्डिले यांनी पारित केले आहे. त्यामुळे अनाथ, सोडुन दिलेले किंवा जमा केलेल्या बालकांना त्यांचे हक्काचे घर मिळाले आहे. देशाबाहेर दत्तक विधान झालेले दुसरे बालक लवकरच अमेरिकेत जाणार आहे. येथील पालकांनी हे बालक दत्तक घेतले आहे. या बालकाचा अंतीम आदेश झाला असून पालक लवकरच वर्धा येथे येऊन बालकाला घेऊन जाणार आहे.

Wardha
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचे भूमिपूजन, जिल्हाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती

दत्तक विधानाचा अंतीम आदेश स्विडन येथील पालकांना देतेवेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर, संरक्षण अधिकारी महेश कामडी, वैशाली मिस्किन, विधी तथा परिविक्षा अधिकारी सुनंदा हिरुडकर, नितेश वैतागे, संत गाडगे महाराज शिशुगृहाच्या अधीक्षक मनिषा घुगुसकर, सामाजिक कार्यकर्त्यां उर्मिला श्रीरामे उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com