‘आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच’ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच’ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईतील दसरा मेळाव्यावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले आहेत. यावरुन एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप सुरु आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबईतील दसरा मेळाव्यावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले आहेत. यावरुन एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप सुरु आहेत. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत सर्वप्रथम शिवसेनेने अर्ज केला. त्यानंतर शिंदे गटातर्फे आमदार सदा सरवणकर यांनी महापालिकेकडे अर्ज केला.

मंगळवारी शिंदे गटाची बैठक वांद्रे येथे झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दसरा मेळाव्याबाबत चर्चा केली. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी बैठकीत व्यक्त केला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी आपल्यालाच परवानगी मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हा मेळावा यशस्वी करण्यासाठी, शक्तिप्रदर्शन करण्यासाठी नियोजनाच्या दृष्टीने चर्चा झाली. याचबरोबर पोलीस ठाण्याजवळ गोळीबाराचा आरोप आमदार सदा सरवणकर यांच्यावर झाल्याच्या पार्श्वभूमीवर चुकीचे वागू नका, अशी सूचना त्यांनी दिली. आमचा दसरा मेळावा होणारच. पण ठिकाण अद्याप अंतिम झालेले नाही, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

‘आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच’ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले...
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com