वर्ध्यात कालबाह्य भंगार बसमधून नागरिकांचा प्रवास; प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ

वर्ध्यात कालबाह्य भंगार बसमधून नागरिकांचा प्रवास; प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ

वर्धा जिल्ह्यात 5 आगार आहेत.वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी ,तळेगाव या आगारचा समावेश आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भूपेश बारंगे, वर्धा

वर्धा जिल्ह्यात 5 आगार आहेत.वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी ,तळेगाव या आगारचा समावेश आहेत. यातील काही आगारातील बस भंगार स्थित असताना सुद्धा रस्त्यावर धावत आहेत.यामुळे विद्यार्थी व प्रवाश्यांच्या जीव धोक्यात घालण्याचा प्रकार आगार प्रमुखाकडून सर्रास केला जात आहे. 'बसचा प्रवास हा सुखाचा प्रवास' म्हटलं जात.मात्र तळेगांव आगारातील बसचा प्रवास धोक्याचा आहे.तळेगांव आगारात जवळपास 15 ते 20 बस प्रवाश्याच्या सोयीसाठी आहे.मात्र यातील बहुतांश बस हे फिटनेस कालबाह्य झाल्या असून यातील अनेक बसचा इन्शुरन्स संपले आहेत.तळेगांव आगारातून आष्टी, तळेगांव, कारंजा या तीन बस स्थानकाच्या परिसरातील विद्यार्थी व नागरिकांच्या प्रवासाकरिता रस्त्यावर फेऱ्या मारताना दिसत आहे.

तळेगांव आगारातील भंगार बस मधुन विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू आहेय .महा 40 एन 8494 या बसचा ऑनलाइन माहिती बघितली असता कुठेही नाही.तरीही ही बस रस्त्यावर धावत आहेय.या बस मध्ये प्रवास हा धोक्याचा आहे.या बस मध्ये असलेलं सीट तुटलेल्या आहेत. बस मधील पत्रे तुटलेले आहेत.बसची चादर तुटून आहेत.अनेक बसचे संकट काळी मार्ग असलेली खिडकी दोराने बांधून ठेवण्यात आल्या आहे.बस मागील भागाचे पत्रे तुकडे तुकडे वेगवेगळे झालेले दिसून येत आहेय.अश्या बस मधून प्रवास हा सुखाचा म्हणावं की धोक्याचा हा प्रश्न आहेत.

एसटी महामंडळ विभागाकडून मुदतबाह्य व इन्शुरन्स (विमा) संपलेल्या बस रस्त्यावर धावत असून यातून दररोज शेकडो विद्यार्थी नागरिक प्रवास करत आहेय.यात अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण राहणार हा प्रश्न आहे. अपघातात मृत्यू झाल्यास त्याला विमा कंपनी मोबदला देणार कसा? ज्या बसचा विमा नाही.तर त्या बसचा अपघात घडल्यास मोबदला कसा मिळेल? इन्शुरन्स व्हॅलीड बस प्रवासांच्या सोयीसाठी उपलब्ध करायला पाहिजेत मात्र येथे सर्रास प्रवसांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाच दुर्लक्ष

जर एखाद्या खासगी वाहनाकडे असे विना कागदपत्रे वाहन रस्त्यावर धावताना दिसताच प्रादेशिक परिवहन विभागात धडक कारवाई करतात मात्र एसटी महामंडळ बसचे कागदपत्रे इन्व्हलीड आहेत.आणि काही बस कागदपत्रे नाही तरीही या बस रस्त्यावर धावत असून यावर प्रादेशिक परिवहन विभाग कारवाई करताना दिसत नाही.काही ठिकाणी बस अपघात घडला मात्र यात मोठी दुर्घटना झाली नसली तरी मोठी दुर्घटना होताना टळली मात्र तळेगाव आगारातून बस अपघात घडल्यास यातून भरपाई कोण भरून देणार?तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. बसचा प्रवास सुखाचा प्रवास अस ब्रीद वाक्य म्हटलं जातं.नागरिकांना अस वाटतंय की बस प्रवास हा आनंदी व सुखाचा प्रवास आहे.मात्र तळेगाव आगार येथून येणाऱ्या बस या प्रवाश्यांना धोक्याची घंटा देत आहे.या बस मधून प्रवास हा सुखाचा नसून धोक्याचं आहेत असच दिसून येत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com