Pravin Datke On Nagpur Stone Pleting : बाहेरच्या लोकांनी प्लॅनिंग करुन दंगल घडवण्याचा प्रयत्न
नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात दगडफेक करण्यात येत आहे. काही नागरिक आणि दोन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांचा फौज फाटा घटना स्थळी दाखल झाली असून सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून शांततेच आवाहन करण्यात येत आहे.
याचपार्श्वभूमिवर नागपूरचे आमदार प्रवीण दटके म्हणाले की, "सकाळी एक आंदोलन झालं पण पोलिसांनी त्यात मध्याशी केली. रात्री महाराजांचं पुतळा परिसर आणि इतर परिसर दगड फेकलेले , गाड्यांची जाळपोळ केली.अग्निशान दलाच्या आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे नियोजन करून एकएक हेरून कुटुंबावर हल्ले झाले".
"मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात झाले आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांनी सामान्य लोकच घर पेटवली आहे...टिपून दगड फेक केली आहे. आता स्थिती स्थिर झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचे आवाहन केले आहे.दोन्ही बाजूचे लोक रस्त्यावर आहेत परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे.ज्यांनी दंगली केली.त्यांच्यावर तत्काळ कारवाई करायची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. सकाळी परिस्थिती वेगळी होती नंतर प्लॅनिंग करून बाहेरून लोक आणून हे दंगल केली आहे. तात्काळ मी स्वतः आता नागपूरला जाणार आहे".