Oxford Word of the Year ठरला 'ब्रेन रॉट' हा शब्द, जाणून घ्या या शब्दाचा अर्थ
मागील काही वर्षापासून आबाल-वृद्धांमध्ये इंटरनेटचा वापर वाढला आहे. सतत समाज माध्यमांवर काही न काही स्क्रोल केलं जातं. इंटरनेट ही माणसाची मुलभूत गरज बनला आहे. जणू काही इंटरनेटवर परालंबित्व वाढलं आहे. त्याशिवाय जगणं ही कल्पनाच बहुतांश जणांना अशक्यप्राय वाटतं. अशा या समाज माध्यमांच्या वापराबाबत 'ब्रेन रॉट' हा शब्द यंदा चांगलाच गाजला आहे. २०२४ वर्षासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडून 'वर्ड ऑफ द इयर' (Oxford Word of the Year) चा मान 'ब्रेन रॉट' या शब्दाला मिळाला आहे. नेमका या शब्दाचा अर्थ तरी काय जाणून घेऊया.
काय आहे ब्रेन रॉट शब्दाचा अर्थ?
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2024 साठी ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर म्हणून 'ब्रेन रॉट' शब्दाची घोषणा केली आहे. 37,000 हून अधिक जणांनी निवडलेले आणि भाषा तज्ज्ञांनी मान्यता दिलेला हा शब्द सोशल मीडियाच्या अति वापराबाबत सामाजिक चिंता व्यक्त करतो. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होणाऱ्या मानसिक आणि बौद्धिक नुकसानाला 'ब्रेन रॉट' हा शब्द वापरला जातो.
२०२३ आणि २०२४ दरम्यान 'ब्रेन रॉट'चा वापर तब्बल २३० टक्क्यांनी वाढला आहे. सतत मोबाईल फोनची स्क्रीन स्क्रोल करताना आपण पाहत असलेला मजकूर उपयुक्त आहे की नाही? हे जाणून न घेता स्कोलिंग केलं जातं. सोशल मीडियाच्या दुनियेत आपण रमतो. जे समोर येईल ते क्षुल्लक किंवा कमी-गुणवत्तेच्या ऑनलाइन कंटेटचं अतिवापर केला जातो. ब्रेन रॉट हा शब्द याच मानसिक अवस्थेसाठी वापरला जातो. तुम्ही अर्थहिन कमी दर्जाची सामग्री हाताळणे यासाठी ब्रेन रॉट हा शब्द वापरला जातो.
सोशल मीडियामुळे गंभीर व मूलभूत समस्यांपेक्षा अत्यंत शुल्लक आणि अर्थहीन अशा कल्पनांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. ब्रेन रॉट शब्द आभासी जीवनातील धोका दर्शवतो. आभासी जीवन भयावहरित्या विकसित होत आहे. Goblin Mode आणि Rizz हे अनुक्रम २०२२ आणि २०२३ मधील ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर होते. रिझचा अर्थ स्टाईल, चार्म किंवा आकर्षिकता; रोमँटिक किंवा लैंगिक जोडीदाराला आकर्षित करण्याची क्षमता असा होतो. गोब्लिन मोडचा अर्थ स्वार्थी, आळशी, लोभी असा होतो. एखाद्याच्या स्वत:च्या प्रतिमेची चिंता न करता हेडोनिस्टिक पद्धतीने सामाजिक अपेक्षा नाकारण्याचा एक नवशास्त्र आहे.