Pahalgam Terror Attack  : पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला; दहशतवाद्यांचे स्केच केले जारी; फोटो आला समोर, शोध सुरू

Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला; दहशतवाद्यांचे स्केच केले जारी; फोटो आला समोर, शोध सुरू

या हल्ल्यातील हल्लेखोराचा पहिला फोटो समोर आला
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास 28 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले.

पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या हल्ल्यातील हल्लेखोराचा पहिला फोटो समोर आला होता. त्यानंतर आता दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. तीन हल्लेखोरांचे स्केच बनवण्यात आले असून हल्ल्याच्यावेळी त्याठिकाणी असणाऱ्या पर्यटकांशी बोलून ही रेखाचित्रे बनवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com