Pakistan Earthquake
ताज्या बातम्या
Pakistan Earthquake : एकीकडे आकाशातून हल्ले आणि आता पाकिस्तानात भूकंपाचे धक्के
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले आहे. पाकिस्तानने अनेक भारतीय शहरांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले.
याच पार्श्वभूमीवर आता ( Pakistan Earthquake ) पाकिस्तानमध्ये 4.0 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. मध्य रात्री 1.44 वाजता 4.0 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे तीव्र धक्के पाकिस्तानात जाणवले असल्याची माहिती मिळत आहे.
या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती मिळालेली नाही. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाचं केंद्र 10 किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती मिळत आहे.