आषाढी वारी 2025 : टेक्नोलॉजीची साथ, भक्तीला गती!
आषाढी वारी 2025 : टेक्नोलॉजीची साथ, भक्तीला गती! पंढरपूर दर्शनासाठी ऑनलाईन टोकन यंत्रणा कार्यान्वित आषाढी वारी 2025 : टेक्नोलॉजीची साथ, भक्तीला गती! पंढरपूर दर्शनासाठी ऑनलाईन टोकन यंत्रणा कार्यान्वित

आषाढी वारी 2025 : टेक्नोलॉजीची साथ, भक्तीला गती! पंढरपूर दर्शनासाठी ऑनलाईन टोकन यंत्रणा कार्यान्वित

विठुरायाचे दर्शन: ऑनलाईन टोकन प्रणालीने वारकऱ्यांना दिला आनंद, पंढरपूर वारीत लाखो भाविक सहभागी.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यातील विविध जिल्ह्यांतून पालख्या आता प्रस्थान करत आहेत. अनेक वारकरी वारीच्या आधीच पंढरपूरला पोहोचून विठुरायाचे दर्शन घेत आहेत. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना, दर्शन अधिक सुलभ आणि सुव्यवस्थित व्हावे, यासाठी यंदा दर्शनासाठी ऑनलाईन टोकन प्रणाली लागू करण्यात आली आहे. ही माहिती ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. त्यांनी सांगितले की, “सुरुवातीला टोकन प्रणालीचा अंदाज घेत आहोत. भविष्यात आवश्यकतेनुसार त्यात आम्ही सुधारणा करत राहू.”

लोकशाही मराठीच्या प्रतिनिधींनी काही वारकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी समाधान व्यक्त केले. एका वारकऱ्याने सांगितले की, “पूर्वी विठुरायाच्या दर्शनासाठी आम्हाला ८ ते १० तास रांगेत थांबावे लागायचे. आता ऑनलाईन टोकन प्रणालीमुळे काही तासांतच दर्शन मिळत आहे, याचा खूप आनंद आहे.”

दिवसभरात एकूण सहा स्लॉट्समध्ये दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे दर्शन प्रक्रिया अधिक सुरळीत होत आहे. ही टोकन प्रणाली वारकऱ्यांसोबतच तरुण भाविक, महिलां-मुलांसाठीही उपयुक्त ठरत आहे. पंढरपूरमध्ये सुरळीत आणि भक्तिमय वातावरणात विठुरायाचे दर्शन अनुभवण्यासाठी ही प्रणाली निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

भविकांनी वेळेत ऑनलाईन टोकन आरक्षित करून या टोकन प्रणाली सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आल्या . ही सेवा 26 जून पर्यंतच उपलब्ध आहे त्यानंतर भाविकांना विठुरायाचे दर्शन नियमितप्रमाणे रांगेमधून घेता येईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com