ताज्या बातम्या
Palghar News MNS : पालघरमध्ये मनसेला मोठा धक्का; केळवे ग्रामपंचायतीच्या सरपंचासह 5 सदस्य शिवसेनेत
पालघरमध्ये मनसेला मोठा धक्का, केळवे ग्रामपंचायतीच्या सरपंचासह 5 सदस्य शिवसेनेत सामील; जिल्हाप्रमुख कुंदन संख्या आणि आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा.
पालघरमध्ये मनसेला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. पालघरमधील सर्वात पहिल्या मनसेचे केळवे ग्रामपंचायतमधील उपसरपंचांसह पाच ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेना शिंदे पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. जिल्हाप्रमुख कुंदन संख्या आणि पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीमध्ये पालघर येथील कार्यक्रम कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील मनसेची मोठी ताकद कमी झाल्याचं आता बोलं जात आहे.