Pandharpur Ashadhi Wari : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

Pandharpur Ashadhi Wari : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वारीतील वाहनांना टोलमाफी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

वारीत टोलमाफी: उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा.
Published by :
Team Lokshahi
Published on

दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही आषाढीची वारी Pandharpur Ashadhi Wari निर्विघपणे पार पडावी. यासाठी आषाढी वारीनिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने अनेक सुविधा जाहीर केल्या आहेत. वारकऱ्यांना विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली होती. त्यानुसार सर्व वारकऱ्यांना टोलमाफी देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यात जागोजागी खड्डे झालेले आहेत, वारीचा मार्ग कुठेही खराब झाला असल्यास डांबरीकरण करून त्याची तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तसेच वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोल मध्ये मोठ्या प्रमाणावर सवलत दिली आहे.

आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येणार आहे. मोठ्या वारीच्या काळात काही वैद्यकीय मदतीची गरज भासली तर त्यासाठी सुसज्ज यंत्रणा कार्यरत असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले. राज्याच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षी प्रमाणे विविध आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. त्याचबरोबर वारकऱ्यांच्या सेवेसाठी यंदा कार्डियाक रुग्णवाहिका पण त्यांच्या सेवेसाठी हजर असणार आहेत. तसेच वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून त्यांना पंढरपूरमध्ये तात्पुरती अतिदक्षता विभाग( ICU) सुविधा ही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर या योजना योग्य रीतीने वारकऱ्यांसाठी उपलब्ध होत आहेत की नाही, यावर नजर ठेवण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबीटकरांनी स्वतः पंढरपूरमध्ये जाऊन लक्ष द्यावे असे, आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

यासोबतच या वर्षी एक महत्वाचा निर्णय घेत गतवर्षी वारीदरम्यान झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनाद्वारे मदत केली जाणार आहे. वारकऱ्यांचे भोजन आणि इतर कार्यवेळच्या वेळी पार पडावी यासाठी तसेच वारी कुठे जास्त वेळ थांबणार नाही यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत . यंदाची वारीही 'स्वच्छ वारी, निर्मल वारी हरित वारी' म्हणून आपल्याला पार पाडायची आहे. यासाठी शासनाद्वारे योग्य ते सहकार्य केले जाईल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com