Murum Minning : पंढरपूर-कुर्डू गावात आज बंदची हाक; मुरूम उत्खनन प्रकरणी गुन्हे मागे घेण्यासाठी बंद
थोडक्यात
पंढरपूरच्या कुर्डू गावात आज सर्वपक्षीय बंदची हाक
मुरूम उत्खनन प्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी बंद
कुर्डू गावाची बीडशी होत असलेल्या तुलनेच्या निषेधार्थही बंद
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या वायरल कॉल मुळे सध्या कुर्डू गाव चांगले चर्चेत आहे. याच कुर्डू गावात मुरूम उत्खनना प्रकरणी दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. वेळीच गुन्हे माघारी न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर झालेल्या टीकेनंतर सरपंच ग्रामसेवक आणि गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे खोटे मागे घ्यावेत या मागणीसाठी आणि गावाची बदनामी करणाऱ्या नेत्यांच्या निषेधार्थ आज कुर्डू गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. तसेच सोमवारी माढा प्रांत कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात येणार आहे.